Viral video: आई वडिलांबद्दल बोलताना चिमुकलीच्या डोळ्यातून दुःख अश्रू कोसळले पहा व्हायरल झालेला व्हिडिओ

Viral video: नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओचे काही कमी नाही दररोज कित्येक व्हिडिओ व्हायरल होताना आपल्याला दिसतात. तर काही प्राण्यांच्या असतात तर काही लहान मुलांचे, तर आपण अशाच प्रकारचा एक व्हिडिओ पाहणार आहोत तो एका चिमुकलीचा आहे तिची चिमुकली आपल्याला रडताना दिसत आहे ती का रडते ते आपण व्हिडिओ पाहूया.

या चिमुकलीचा व्हायरल झालेला व्हिडिओ एका शिक्षिके सोबत संवाद करताना आहे. शिक्षिका आणि विद्यार्थिनी संवाद करताना ते रडत असल्याचे दाखवत आहेत. ती विद्यार्थी बोलता बोलताच रडत आहे.

विद्यार्थी: ती विद्यार्थी असेल म्हणती आहे मी तिकडे जायचे म्हणून रडले की माझे वडील रागवतात मला एक दिवस शाळेत जायचे नव्हते तेव्हा माझ्या मोठ्या भावाने पप्पाला फोन लावून सांगितले पप्पा म्हटले की मी कारखान्याहून आल्यावर खूप मारीन पप्पांनी कारखान्याहून आल्यावर माझ्या पाठीत एक धक्का टाकला तेव्हा त्याचे पाचही बोटे माझ्या पाठीवर उमटले होते.

शिक्षिका: शिक्षिका त्या विद्यार्थिनी ला असे म्हणते आहे की प्रत्येक आई-वडील हे आपल्या मुलांची काळजी करत असतात त्यांना असे वाटते की आपल्या मुलांनी शाळेत जायला पाहिजे. शिक्षण घेऊन मोठे व्हायला पाहिजे त्यामुळे तुमचे कर्तव्य आहे की तुम्ही दररोज शाळेत येऊन आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावीत. आम्ही जसे कारखान्याला जाऊन ऊस तोडून काम करतो. आमच्या मुलांना असे करण्याची गरज पडू नये म्हणून मुलांनी शिकून मोठे व्हावे चांगली नोकरी करावी. बर आता तुला आई-वडिलांशिवाय आजीपाशी करमते का? शिक्षकांनी विचारले.

चिमुकली: नाही

शिक्षिका: आठवण येते का तुला त्यांची

चिमुकली: हो येते

शिक्षिका: केव्हापासून आजी पाशी राहती

चिमुकले: पहिलीपासून

शिक्षिका:  गावी कधी जातेस का?

चिमुकली: सुट्ट्यांमध्ये जाते.

शिक्षिका: रडू नकोस आता जाऊ दे तुला शाळेत करमते का?

चिमुकली: होय

शिक्षिका: तू आता खूप हुशार झाली आहे अभ्यास पण करतेस. (शिक्षिका म्हणतात आता अभ्यास करावासा वाटतो ना तुला)

चिमुकली: हो…(त्यानंतर येथे व्हिडिओ संपतो.)

या व्हिडिओमध्ये ती चिमुकली तिच्या आई-वडिलांपासून दूर आजी बाबा बरोबर राहत आहे. आजीच्या गावी शाळा शिकते. या चिमुकलीची आई-वडिलांपासून दूर राहण्याची वेदना तुम्हाला व्हिडिओ दिसून येईल ती चिमुकली हसता हसतात रडू लागली आहे. प्रत्येक हा आनंदी असतो असं नाही. चेहऱ्यामागे काहीतरी दुःख नक्कीच लपलेले असते. या चिमुकलीचा व्हायरल व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

i am Shivdatta Kashid

Sharing Is Caring:

Leave a Comment