Namo Shetakri Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार रुपये सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन किंवा तीन दिवसात जमा केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा आणि नमो किसन योजनेचा हप्ता एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे.
परंतु, अनेक जणांचे असे म्हणणे आहे की नमो शेतकरी योजनेचा 2000 हजार रुपयांचा हप्ता हा पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. आणि त्याचबरोबर पी एम किसान योजनेचा हप्ता 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. यामुळे ही बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची आहे.
त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या कारण तुम्हाला सरकारच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची ई-केवायसी केली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते जमा करण्यात आले आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता चौथा हप्ता जमा केला जाणार आहे.Namo Shetakri Yojana
नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील प्रक्रिया वापरा:
1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादी पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ उघडा.
2. लॉगिन किंवा लाभार्थी स्थिती निवडा
- मुख्यपृष्ठावर तुम्हाला “लाभार्थी स्थिती” (Beneficiary Status) नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
3. तपशील भरा
- तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा नोंदणी क्रमांक (Registration Number) भरा.
- दिलेला कॅप्चा कोड टाका आणि “डेटा मिळवा” (Get Data) पर्यायावर क्लिक करा.
4. यादी तपासा
- एक नवीन पेज उघडेल, जिथे तुमचा हप्ता आणि लाभार्थी यादीबद्दलची सविस्तर माहिती दिसेल.
- लाभार्थी यादी PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी तेथे दिलेला “डाऊनलोड” पर्याय वापरा.
5. बँकेची पडताळणी
जर लाभार्थी यादीत तुमचे नाव असेल, पण रक्कम जमा झालेली नसेल, तर बँकेत तपासणी करा.Namo Shetakri Yojana